Facebook WhatsApp Telegram

25,487 रिक्त पदे, SSC GD भरती 2025: पूर्ण माहिती, पात्रता, पगार, निवड प्रक्रिया

25,487 रिक्त पदे, SSC GD भरती 2025: पूर्ण माहिती, पात्रता, पगार, निवड प्रक्रिया

भारतामध्ये SSC GD भरती 2025 ही लाखो तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. SSC म्हणजे Staff Selection Commission आणि GD म्हणजे General Duty Constable. या भरतीद्वारे BSF, CISF, CRPF, ITBP, SSB, SSF आणि इतर CAPF दलांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती होते. 2025 मध्ये देखील मोठ्या संख्येने पदे अपेक्षित आहेत.

SSC GD भरती 2025 म्हणजे काय?

SSC दरवर्षी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी GD कॉन्स्टेबलची भरती प्रक्रिया आयोजित करते. देशाची सुरक्षा, सीमांचं रक्षण आणि आंतरिक शांती राखण्यासाठी हे जवान नेहमी सज्ज असतात.

SSC GD भरती 2026 — महत्त्वाच्या तारखा

घटक तारीख व वेळ
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 01 डिसेंबर 2025
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
ऑनलाईन अर्जामध्ये दुरुस्ती (Correction Window) 08 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 (रात्री 11:00 वाजेपर्यंत)
संगणकावर आधारित परीक्षा (Computer Based Exam) चे अंदाजे वेळापत्रक फेब्रुवारी ते एप्रिल 2026

(टीप: या तारखा अंदाजे असून SSC कडून अधिकृत नोटिफिकेशन आल्यानंतर बदलू शकतात.)

पदांचे तपशील (Expected Vacancies)

SSC GD 2025 मध्ये  विविध दलांमध्ये पदे उपलब्ध असतात:

दल (Force) पुरुष SC पुरुष ST पुरुष OBC पुरुष EWS पुरुष UR पुरुष एकूण महिला SC महिला ST महिला OBC महिला EWS महिला UR महिला एकूण एकूण (Grand Total)
BSF 78 58 113 53 222 524 11 7 20 5 49 92 616
CISF 1918 1391 2958 1321 5547 13135 205 152 326 150 627 1460 14595
CRPF 870 32 1343 598 2523 5366 15 8 27 8 66 124 5490
SSB 257 167 412 176 752 1764 0 0 0 0 0 0 1764
ITBP 146 139 219 109 486 1099 24 25 38 16 91 194 1293
AR (Assam Rifles) 161 302 278 157 658 1556 14 30 25 10 71 150 1706
SSF 3 2 6 2 10 23 0 0 0 0 0 0 23
एकूण (Total) 3433 2091 5329 2416 10198 23467 269 222 436 189 904 2020 25487

वयाची अट (Age Limit)

वय मोजण्यासाठीची महत्त्वाची तारीख 01 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे.
त्याअनुसार —

  • उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे.
  • म्हणजेच, उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2003 नंतरचा नसावा आणि 01 जानेवारी 2008 पूर्वीचा नसावा.

थोडक्यात:

  • किमान वय – 18 वर्षे
  • कमाल वय – 23 वर्षे
  • वय मोजण्याची तारीख – 01.01.2026

(शासन नियमांनुसार राखीव प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत लागू असेल.)

वयोमर्यादेत सवलत (Age Relaxation) — SSC GD 2026

कोड क्रमांक वर्ग (Category) उच्च वयोमर्यादेपेक्षा मंजूर सवलत
1 अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (SC / ST) 5 वर्षे
2 इतर मागासवर्गीय (OBC) 3 वर्षे
3 माजी सैनिक (Ex-Servicemen) लष्करी सेवेत घालवलेला कालावधी वजा करून 3 वर्षांची सवलत
4 1984 च्या दंगलीत मृत झालेल्यांच्या कुटुंबातील मुले व अवलंबित — (अनारक्षित / EWS) 5 वर्षे
5 1984 च्या दंगलीत मृत झालेल्यांच्या कुटुंबातील मुले व अवलंबित — (OBC) 8 वर्षे
6 1984 च्या दंगलीत मृत झालेल्यांच्या कुटुंबातील मुले व अवलंबित — (SC / ST) 10 वर्षे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Click here

सविस्तर अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp चॅनेल Join करा

Click here